डुग्गीपार जवळील राष्ट्रीय महामार्गावर ट्रक पेटला

0
24

गोंदिया,दि.01: राष्ट्रीय महामार्गावरील सडक अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार येथे 1 जानेवारी रोजी दुभाजकावर मॅगनिज वाहून नेणारा ट्रक धडकल्यानंतर सर्विस रोडवर पलटला व अचानक पेट घेतला.सीजी 04, एनएस 9458 असा वाहनाचा क्रमांक आहे.या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले.सडक अर्जुनी व देवरी नगरपंचायतच्या अग्निशमन गाड्या वेळेवर पोहोचल्याने मोठी दुर्घटना टळली.