घाटकुरोडा घाटातून वाळु चोरट्यांना अटक

0
17

12 लाखांचा मुद्देमाल जप्त : विशेष पथकाची कारवाई
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा घाटातून अवैधरित्या वाळु चोरणाºया दोन आरोपींना पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अटक केले. ही कारवाई 29 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास करण्यात आली. यावेळी दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह एक ब्रास वाळु असा एकूण 12 लाख 4 हजार रुपयाच्ाां मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन व अवैध धंद्यांवर आळा घालण्याकरिता पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पिशेष पथकास आदेशित केले होते. त्या अनुषंगाने जिल्ह्यात अवैध धंद्यांविरूद्ध विशेष धडक मोहीम सुरू आहे. दरम्यान, तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा घाट, वैनगंगा नदीच्या पात्रातून काही लोक अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून वाळूची चोरी करून वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. त्यांनी घाटकुरोडा घाटावर धाड टाकून दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह एक ब्रास वाळु असा एकूण 12 लाख 4 हजार रुपयाच्ाां मुद्देमाल जप्त करण्यात केला तसेच आरोपी ट्रॅक्टर चालक विजय फुलचंद खंगार (वय 27, रा. घाटकुरोडा, ता.तिरोडा), दिनकर सुरदास मेश्राम (वय 32, रा. घाटकुरोडा, ता. तिरोडा) यांना अटक करून तिरोडा पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या विशेष पथकातील पोलीस हवालदार सुजित हलमारे, महेश मेहर, पोलीस नायक शैलेश कुमार निनावे, दयाराम घरत, चापोशी हरिकृष्ण राव यांनी केली.