गोलु तिवारी हत्याकांड प्रकरणात सहा ते सात जण ताब्यात

0
68
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 34;

गोंदिया,दि.२३- गोंदियातील रिंगरोड स्थित हनुमाननगर स्थित रहिवासी गोलु उर्फ रोहीत हरिप्रसाद तिवारी (वय ३६)तिवारी यांची सोमवारला रात्री ९ वाजेच्या सुमारास गोळी घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती.या प्रकरणात पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे  व अप्पर पोलीस नित्यानंद यांच्या मार्गगदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षष दिनेश लबडे ,रामनगरचे पोलीस निरिक्षक संदेश केंजळे व रावणवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक यांची तपास पथके तयार करण्यात आली होती. तपासाची चक्रे गतीशील फिरवून पोलिसांनी या प्ररकरणात अंदाजे सहा ते सात जणांना ताब्यात घेत विचारपूस सुरू केली असून यात आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.