प्रेयसीने बनवला स्वत:च्या आत्महत्येचा LIVE व्हिडिओ

0
18

भंडारा,दि.26- प्रियकराच्या त्रासाला कंटाळून प्रेयसीने विवाहाला अवघे 10 दिवस शिल्लक असतानाच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात घडली आहे. निशा कावळे (वय-21) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. विशेष म्हणजे निशाने आत्महत्या करतानाचा व्हिडिओ देखील शूट केला आहे.

सूत्रांनुसार, भंडारा जिल्ह्यातील रोहणी येथे राहाणारी निशा कावळे हिचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. येत्या 4 फेब्रुवारी रोजी निशाचा विवाह होणार होता. मात्र त्याआधीच निशाने विषप्राशन करुन जीवनप्रवास संपवला. याप्रकरणी लाखांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी सध्या अधिक तपास सुरु आहे.निशाचा प्रियकर निखिल बोरकर याच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. निशा आणि निखिल बोरकरमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, निखिल लग्नासाठी टाळाटाळ करत होता. तिच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या मुलासोबत तिचा विवाह ठरवला होता. 31 डिसेंबर रोजी तिचा साखरपुडाही झाला होता