प्रियकराच्या नाही तर कुटूंबियांच्या जाचाला कटांळुन निशाची आत्महत्या

0
11

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रावरून उलघडले रहस्य

भंडारा 26-तालुक्यातील रोहणी येथील कु.निशा देविदास कावळे नामक २१ वर्षिय युवतीने (ता.२४) रोजी पहाटे सुमारास स्वतःच्या राहते घरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली असून, ३१ डिसेंबर रोजी तिचा साखरपुडा झाला होता. येत्या ४ फरवरीला तिच लग्न होऊ घातलाहोता.विशेष म्हणजे निशाने विष प्राशन करतांनाचा व्हिडीओ देखील तयार करून आपल्या प्रियकराला (निखील बोरकर लाखांदुर) पाठविला.
प्रियकराच्या ञासाला कंटाळून निशाने आत्महत्या केल्याचे तिच्या कुटूंबियांसह सर्वञ बोलले जात असले तरी निशाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पञाद्वारे असे दिसून येत आहे की, प्रियकराच्या जाचाला कंटाळून नाही तर घरच्यांच्या जाचाला कटांळुन आत्महत्या केली आहे.
निशाने लिहीलेल्या पञानुसार ‘माझा प्रियकर निखिल हा खुप चांगला असून, तो माझ्यासोबत लग्न करायला तयार होता, आणी मी सुद्धा तयार होते, पण काही कारणास्तव मी त्यांच्यासोबत लग्न करू शकत नसल्याने मी आत्महत्या करत आहे’ यावरून निखिलकडुन निशाला कसल्याही प्रकारचा ञास नव्हता असे निर्दशनास येत आहे.
निखिल आणि निशा एकमेकांवर खुप प्रेम करत होते. व लग्नाला ही तयार होते. कदाचित घरच्यांना हे मान्य नसल्यामुळे निशाच त्यांनी बळजबरीने लग्न ठरवल असाव आणी निशाला हे लग्न मान्य नसाव यामुळे कदाचित तिने आत्महत्या केली असावी अशाही चर्चा आता रंगु लागल्या आहेत.
प्रसारीत होत असलेल्या बातम्यांमुळे निखिलला दोषी ठरवले जात असले तरी अद्यापहि निखिल दोषी असल्याचे ठोस पुरावे मिळाले नसून, पुढील तपास पोलीस स्टेशन लाखांदुर कडुन चालु आहे.