जिल्हा उपनिबंधकासह तीन जखमी, चालक ठार

0
11

धुळे,दि.30 : भरधाव वेगाने येणाºया कंटेनरने कारला दिलेल्या जोरदार धडकेत कार चकनाचूर झाली असून जिल्हा उपनिबंधक, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अन्य एक जण असे तीन अधिकारी जखमी झाले़.तर कार चालकाने मात्र जागेवरच प्राण गमविला.जखमींवर धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत़.शिंदखेडा येथील देखरेख संघाच्या हॉलमध्ये कर्जमाफी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती़. या बैठकीचे कामकाज आटोपून जिल्हा उपनिबंधक जे़ के़ ठाकूर, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धिरज चौधरी, जिल्हा विशेष लेखा परिक्षक पी़ एस़ पाटील यांच्यासह विविध कार्यकारी सोसायटी, बँक, लेखा विभाग, सहाय्यक निबंधक कार्यालय अशा विविध विभागातील अधिकारी परत येत होते. एमएच १८ बीसी ७८९२ क्रमांकाच्या कारने ठाकूर, चौधरी आणि पाटील हे तिघे धुळ्याकडे येतांना दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास त्यांची कारला गोराणे (ता़ शिंदखेडा) येथील फाट्यावरील महामार्गावर आली असता समोरुन येणार्या एमएच १५ डीके १७७३ क्रमांकाच्या कंटेनरने जोरदार धडक दिली़. ही धडक इतकी जबरदस्त होती की कारचा चक्काचूर झाल्याने चालक भटू बागूल (रा़ वाडीभोकर ता़ धुळे)यांचा जागेवरच त्याचा मृत्यू झाला़.योगायोगाने अपघात स्थळापासून जवळच रुग्णवाहिका असल्याने जखमींना तातडीने धुळ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़. कंटेनर चालक घटनास्थळावरुन ट्रक सोडून पळून गेला़.