३ हजाराची लाच घेतांना सहा.कार्यक्रम अधिकारी बिसेन रंगेहाथ जाळ्यात

0
25

आमगाव,दि.०१- पंचायत समिती कार्यालयातंर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विभागात कार्यरत कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रामेश्वर खेमराज बिसेन यांना ३ हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.तक्रारदार हा अंजोरा निवासी शेतमजूर असून रोजगार हमी योजनेंतर्गंत जनावरांचा गोठा बांधकाम मंजूर झालेला होता.मंजूर गोठ्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश घेण्याकरीता तक्रारदार बिसेन यांच्याकडे गेला असता त्याने मोबदला म्हणून ५ हजार लाचेची मागणी केली.तक्रारदाराला ती द्यायची मुळीच ईच्छा नसल्याने ३१ जानेवारीला गोंदियातील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली.त्या तक्रारीच्या आधारावर आज लाचलुचपत विभागाने आमगाव पंचायत समिती परिसरातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कार्यालयात सापळा रचला असता बिसेन यांना तक्रारदाराकडून ३ हजार रुपयाची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले.याप्रकरणी आमगाव पोलीस ठाण्यात कलम ७,१३(१)(ड),सहकलम १३(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक रमाकांत कोकाटे,पोलीस निरिक्षक दिलीप वाढणकर,पो.हवा.राजेश शेंद्रे,रंजित बिसेन,दिगंबर जाधव,नितिन रहागंडाले,देवानंद मारबते आदींनी केली.