बोदलकसा परिसरात अल्पवयीन प्रेमीयुगलाची आत्महत्या

0
45

गोंदिया,दि.०१-गोंदिया,दि.०१-तिरोडा तालुक्यातंर्गत येत असलेल्या सुकडी जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ट महाविद्यालयात शिक्षण घेणाèया प्रेमीयुगलाने बोदलकसा परिसरातील जंगलभागात विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारला उघडकीस आली.मृतामध्ये जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ट महाविद्यालय सुकडीची(रा.मेंढा) इयत्ता १० व्या वर्गात शिकत असलेली वैशाली ओंकार भैरम व इयत्ता १२ वीत असलेल्या अमन सुभाष रहागंडाले(रा.डोंगरगाव) यांचा समावेश आहे.बोदलकसा भागातील कोडेबर्राच्या जगंलातील पहाडावर चढून त्यांनी विष प्राशन केले.आत्महत्या करण्यामागचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.हे दोघेही शाळेच्या गणवेशात होते.घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे सभापती रमेश अंबुले यांनी घटनास्थळी भेट दिली.वैशाली आणि अमन या दोघांमध्ये प्रेम सबंध होते.आज आपल्या घरून शाळेत जातो असे सांगून सकाळी १० वाजताच्या सुमारास निघाले.शाळेतही गेले तिथून मात्र काही वेळानंतर ते सरळ बोदलकसाच्या जंगलाकडे निघाले. तिथे जाऊन ऊंदीर मारण्याची विषारी औषध (कॅट) खाऊन आत्महत्या केली.त्याचदरम्यान जंगलात गुरे चारणाऱ्या गुराख्याला दोघांचेही मृतदेह दिसताच तिरोडा पोलिसांना माहिती दिली.त्यानंतर तिरोड्याचे पोलीस निरिक्षक कोळी यांच्या पथकाने घटनास्थळ गाठत दोघांचे मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणी करीता तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. उत्तरीय तपासणी अहवाल आल्यावरच त्या दोघांच्या मृत्यूचे खरे कारण कळणार असून त्यांची हत्या आहे की आत्महत्या याचाही उलगडा होणार आहे. पोलिसांना मात्र घटना स्थळावरून उंदीर मारणारे औषध मिळाल्याने दोघांनी ते औषध खाऊनच आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे.