उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून सुनिल दिवसे एसीबीच्या जाळ्यात

0
13

गडचिरोली ,दि.01- येथील उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून सुनिल मुरलीधर दिवसे याला १० हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाच-लूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी रंगेहात आज अटक केली आहे.तक्रारकर्ता शेतकरी असून त्यांना पोटहिशाप्रमाणे मिळालेली स्वत:च्या मालकीची शेतजमीन बाजार भावाप्रमाणे विक्री केलेली आहे. तक्रारदाराची शेतजमीन वर्ग-२ ची असल्याने तिची रजिस्ट्री करावयाची असल्याने त्यांनी शेतजमीन वर्ग-१ करण्याकरीता सर्व कागदपत्रासह उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालयात ३ ते ४ वर्षाअगोदर अर्ज केला होता. तक्रारकर्ता वारंवार उपविभागीय अधिकारी कार्यालयात जावून आपल्या केससंबंधाने विचारणा करीत होता. परंतु त्यांना काही ना काही कारणाने कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी परत पाठवित होते.
तक्रारकर्ता २५ जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात जावून आपल्या शेतजमिनीच्या वर्ग-१ च्या केससंबंधाने अव्वल कारकून सुनिल मुरलीधर दिवसे याची भेट घेतली. तक्रारकर्त्यास वर्ग-१ शेत जमिनीच्या मंजूर असलेल्या आदेशाची प्रत देण्याच्या कामाकरीता सुनिल दिवसे याने ३० हजार रूपये लाच रक्कमेची मागणी केली. आरोपी सुनिल दिवसे याने मागितलेली लाच रक्कम देण्याची तक्रारदाराची मुळीच इच्छा नसल्याने लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय गडचिरोली येथे आज १ फेब्रुवारी रोजी तक्रार दिली.
लाच- लुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात आरोपी सुनिल दिवसे विरूध्द तक्रार प्राप्त झाल्याने कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात सापळ्याचे आयोजन केले. आरोपीने तक्रारदारास स्वत:च्या मालकीच्या शेतजमिनीची मंजूर असलेल्या वर्ग-१ आदेशाची प्रत देण्याच्या कामाकरीता स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता वाम व भ्रष्ट मार्गाने २५ हजार रूपये लाच रक्कमेची मागणी करून तडजोडीअंती २५ हजार रूपये लाच रक्कमेपैकी अर्धी रक्कम १० हजार रूपये पंच साक्षीदारासमक्ष लाच रक्कम उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालयात स्वीकारताना रंगेहाथ पडकण्यात आले. आरोपीचे कृत्य कलम ७, १३ (१) (ड) सह १३ (२) लाचलूचपत प्रतिबंधक कायदा सन १९८८ अन्वये पोलिस ठाणे गडचिरोली येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
सदर कारवाई लाच-लूचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलिस उपायुक्त/पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय माहूलकर, पोलिस उपअधीक्षक रोशन यादव, पोलिस उपअधीक्षक डी. एम. घुगे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक एम. एस. टेकाम, सहाय्यक फौजदार मोरेश्वर लाकडे, पोलिस हवालदार विठोबा साखरे, पोलिस हवालदार सत्यम लोहंबरे, नायक पोलिस शिपाई रविंद्र कत्रोजवार, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकवार, महेश कुकुडकार, देवेंद्र लोनबले, गणेश वासेकर, सोनल आत्राम, सोनी तवाडे, तुळशीदास नवघरे, वडेट्टीवार यांनी केली.