४ हजाराची लाच घेतांना आरएफओसह वनरक्षक जाळ्यात

0
7

गोंदिया,दि.०१- गोंदिया उपवनसरंक्षक कार्यालयांतर्गत येत असलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती श्रध्दा जायस्वाल(वय ३५) तसेच वनरक्षक डोमेंद्रqसग परिहार(वय५२) यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारदाराकडून ४ हजाराची लाच घेतांना रंगेहाथ अटक केली.तक्रारदार हे ५९ वर्षीय शेतकरी असून कापलेले लाकूड वाहून नेण्याचा परवाना करीता अर्ज केलेला होता.त्या अर्जावर नाहकरत देण्यासाठी आरएफओ श्रीमती जायस्वाल यांच्याकरीता वनरक्षक परिहार यांनी १४ हजार रुपयाची मागणी केली.परंतु ती रक्कम मुळीच द्यायची इच्छा नसल्याने तक्रारदाराने भंडारा येथील लाचलुचपत विभागाकडे २४ जानेवारीला तक्रार दाखल केली.त्या तक्रारीच्या आधारावर आज गोंदिया येथील उपवनसरंक्षक कार्यालयात सापळा रचण्यात आला असता १४ हजाराची मागणी केल्यानंतर ४ हजार रुपये घेण्याची तयारी दर्शवित ४ हजार रुपये स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.ही कारवाई पोलीस अपअधिक्षक दिनकर सावरकर व पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या पथकाने केली.