हिवतापाच्या गोळ्या खाऊन परिचारिकेने केली आत्महत्या

0
24

आलापल्ली,दि.05- एटापल्ली तालुक्यातील तोडसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या ताडपल्ली  येथील एका परिचारिकेने हिवतापाच्या गोळ्या  सेवन करून आत्महत्या केल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी घडली. रजना तुळशिराम वेलादी (२७) रा. ताडपल्ली असे आत्महत्या करण्यार्या परिचारिकेचे नाव आहे. रजना वेलादी ही ताडपल्ली येथील उपकेंद्रांत परिचारीका म्हणून कार्यरत होती. तीने काल रात्री ८ वाजताच्या सुमारास  हिवतापाच्या गोळ्या सेवन केल्यानंतर तिच्या हालचालीत बदल दिसल्याने शेजारीच राहणार्या दुसर्या परिचारीका व तिचा भावाने रात्री रजनाच्या घरी जाऊन दार उघडण्यास सांगितले. परंतु दार उघडल्या गेला नाही. त्यामुळे मागच्या  बाजुला असलेला दार तोडून परिचारीका व तिचा भाऊ आत शिरले, असता रजनाच्या तोंडातून हिवतापाच्या गोळ्या सेवन केल्याचा वास येत असल्याचा  संशय आला. त्यानंतर रजनाला रात्री ११ वाजता एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात  आले. मात्र एटापल्ली  येथील रुग्णालयातील डॉक्टरांनी रजनाला मृत घोषित केले. घटनेची तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात आली  असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय  राठोड यांच्या  मार्गदर्शनात पोलिस करीत आहेत.रजनाने नेमकी आत्महत्या कशामुळे केली याचे कारण कळू शकले नाही. रजनाचे वडील एटापल्लीत पंचायत समितीत चपराशी पदावर कार्यरत असल्यामुळे ते पत्नीसह एटापल्ली येथे राहत होते.