वारीला निघालेल्या 4 भाविकांचा ट्रक अपघातात मृत्यू

0
9

वाशिम,दि.05: श्री. क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवात सहभागी होण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील उमरा-कापसे येथून शेगाव येथे जात असलेल्या भाविकांच्या वाहनास मागून येणा-या भरधाव ट्रकने धडक दिली. अकोला जिल्ह्यातील पातूर-बाळापूर मार्गावरील बाघ फाट्यानजीक या अपघातात चार भाविक ठार, तर तीन गंभीर जखमी झाले. मृतकांमध्ये तीन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे.