युवतीवर अत्याचार करून जबरदस्तीने लग्न; आरोपी फरार

0
6

अमरावती,दि.02ः- नात्याने पुतणी असलेल्या अल्पवयीन युवतीला देवदर्शनासाठी जात असल्याचे सांगून मावस चुलत्याने तिच्यावर अत्याचार करीत जबरदस्तीने लग्न केल्याची घटना नुकतीच तालुक्यातील शेंदुरजना घाट पोलिस ठाण्यांतर्गत घडली. घडलेला प्रकार असहय्य झाल्याने युवतीने एचव्हीपीएमच्या चाईल्ड लाईनवर घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. युवतीकडून आलेल्या तक्रारीच्या अाधारे शेंदुरजना घाट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी युवक फरार असून नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.शुभम राजेंद्र आगरकर (२२) रा. तिवसा घाट असे आरोनपी युवकाचे नाव आहे. युवतीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आरोपी हा आईसह पीडित युवतीकडे आला. त्याने तिच्या वडिलांना देवदर्शनासाठी घेऊन जात असल्याची माहिती दिली. पालकांनीही त्यासाठी परवानगी दिली, परंतु आरोपीने तिला देवदर्शनासाठी न नेता अमरावती येथे नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करून वकिलाकरवी लग्नाचे कागदपत्र तयार करून तिच्याशी जबरदस्तीने लग्न केले. त्यानंतर तिला घरी आणून सोडले. नातेवाईकांनी लक्ष न दिल्याने युवतीने चाईल्ड लाईनवर संपर्क करून झालेल्या प्रकाराची माहिती दिली.