मुंगूस शिकार प्रकरणी तीन शिकारींना अटक

0
26

सडक अर्जुनी,दि.०३:वनपरिक्षेत्र सडक अजुर्नी अंतर्गत येणार्‍या डोंगरगाव डेपो बिटच्या कक्ष क्र. ६७५ संरक्षीत वनात गस्तीवर असलेल्या व्याघ्र संरक्षण दलाच्या कर्मचार्‍यांनी तीन आरोपींना मुंगूसाची शिकार करताना रंगेहात पकडल्याची घटना घडली.जितलाल सदाराम मसराम (३५), धनलाल तुकाराम पंधरे (३५), दसाराम तुळसीराम कुसराम (६0) तिघेही रा. खडकी/बा. असे आरोपींची नावे असून त्यांच्याकडून मुंगूसाचे मांस व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. संबंधित तिन्ही आरोपींविरुध्द वन गुन्ह्याची नोंद करण्यात आली असता तिघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सदर प्रकरणाचा तपास एम. आर. शेख गोंदिया यांच्या मार्गदर्शनात जी. एस. राठोड व एस. आर. गडवार, सुनिल खांडेकर, अरविंद बडगे करीत आहेत.