घंटानाद आंदोलन ७ एप्रिलला

0
6

गोंदिया ,दि.०३:: महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने शासनाच्या विरोधात तसेच अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्याच्या मुख्य मागणीला घेऊन ७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे प्रसिद्धी प्रमुख संदीप सोमवंशी यांनी दिली आहे. राज्य शासनाने सन २00५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचार्‍यांची जुनी पेंशन बंद केली आहे. त्याचप्रमाणे २३ ऑक्टोबर २0१७ रोजी वरिष्ठ वेतन श्रेणी बाबतचा अन्यायकारक शासन निर्णय निर्गमित केला आहे. हा निर्णय रद्द करण्यात यावा तसेच कर्मचार्‍यांना जुनी पेंशन लागू करण्यात यावी, या मागणीला घेऊन हे राज्यव्यापी घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी होणार आहेत.