देसाईगंजच्या हनुमान वाडार्त शिक्षकाचा खून

0
8

देसाईगंज,दि.12:- येथील हनुमान वाडांत वास्तव्यास असलेल्या राजाराम परशुरामकर या 54 वषींय शिक्षकाचा घरात शिरून खून करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे.
परशुरामकर यांचा मुलगा नागपूर येथील दवाखान्यातून उपचार घेऊन परिवारासह घरी पोहचला असता आरोपींना घरातून पळताना पाहुन त्यांची भांबेरी उडाली होती. दरम्यान राजाराम परशुरामकर हे घरी एकटेच असताना त्यांचा घरात घुसून खुन करण्यात आला असून पैकी एका आरोपीला मृतकाच्या मुलीने ओळखले आहे. दरम्यान देसाईगंज पोलीसांना घटनेची माहीती मिळताच पोलीसांनी घटनास्थळ गाठुन मुलीच्या बयाना वरुन सदर आरोपिस ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे. खून करण्यामागचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसुन परशुरामकर हे कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथे शिक्षक या पदावर कार्यरत होते.काही दिवसापुवीं मुलाची तब्येत बिघडल्याने नागपूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले असता कुटुंब त्याच्या सोबतीला असल्याने ते घरी एकटेच राहात होते. आज अचानक परीवार घरी पाय का ठेवत नाहीत तोच घरातुन काही ईसम पळून जात असल्याचे पाहताच घरात जाऊन पाहताच परशुरामकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. दरम्यान पळून जाणा-या पैकी एका ईसमाला मुलीने ओळखले असल्याने सदर ईसमास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सिद्धानंद मांडवकर यांच्या माग॔दश॔नात देसाईगंज पोलीस करीत आहेत.