फूस लावून बाल मजुरांना नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा ‘पर्दाफाश’

0
7

गोंदिया,दि.28: कमी पैसे देवून अधिक नफा कमविण्याच्या उद्देशाने बाल मजुरांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात  नेणाऱ्या टोळीचा ‘पर्दाफाश’ गोंदियाच्या रेल्वे सुरक्षा बलाने केला आहे.बालमजुर आणि त्यांना घेऊन जाणार्या युवकाला सोबत घेऊन रायपूर रेल्वेस्थानकावर पिंटू कोरडे नामक व्यक्तीला आरोपी पंकजद्वारे फोन करुन बोलाविले असता.तिथे आल्यानंतर आधीच रापळा रचलेल्या रेल्वेपोलीसांनी पिंडू कोरडेला ताब्यात घेत टोळीचा पर्दाफाश केला.या मुलांना कॅटरिंगच्या कामासाठी वापरले जात असल्याचे तपासात समोर आले.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या सुरक्षा बल नागपूरचे मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे व सहायक सुरक्षा आयुक्त ए.के. स्वामी यांच्या मार्गदर्शनात, पोस्ट प्रभारी किरण एस. व गोंदियाचे सीबीआय निरीक्षक एस. दत्ता यांच्या मार्गदर्शनात स्पेशल टास्क टीम गोंदियाचे उपनिरीक्षक विवेक मेश्राम, उपनिरीक्षक एस.एस.बघेल व जी.आर. मडावी, आर. सी. कटरे, आरक्षक पी.एल. पटेल, आर.एस.के. वरकडे हे शनिवारी (दि.२५) दुपारी गोंदिया रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर नजर ठेवून होते. दरम्यान दुपारी त्यांना दोन अल्पवयीन मुले घाबरलेल्या स्थितीत भटकताना आढळले. त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी आपले नाव अक्षय जगत धुर्वे (१३) व आकाश बालकराम मडावी (१५) दोन्ही रा. सेघाट ता. वरूड जि. अमरावती असे सांगितले.

दोघांची चौकशी केली असता गोंदियाला येण्याबाबत  त्यांनी वेगवेगळी उत्तरे दिल्यामुळे दोघांवर नजर ठेवण्यात आली. त्यांच्यासोबत पुन्हा दोन जण असून ते आपल्या इतर साथीदारांचा शोध घेत असल्याचे आढळले. काही वेळेनंतर प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर त्यांचे आठ इतर सोबती आढळले. त्यांच्यावर पुन्हा नजर ठेवण्यात आली. काही वेळानंतर एक तरुण त्यांना प्रलोभन देवून दुसऱ्या ठिकाणी घेवून जाण्यासाठी गाडीची वाट पहात असल्याचा आढळला. एकूण १० अल्पवयीन मुलांना घाबरलेल्या स्थितीत बघताच उपनिरीक्षक विवेक मेश्राम, एस.एस. बघेल यांना बाल तस्करीचा संशय आला. त्यांनी टीमद्वारे सर्व अल्पवयीन व त्यांना सोबत नेणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता माहिती दिली.त्यांनतर. आरोपी पंकजसह ठेकेदार व पिंटू कोरडे यांना घेवून ट्रेनने २६ मे २०१८ रोजी सकाळी ६ वाजता रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयात नेण्यात आले. सर्व अल्पवयीन असल्यामुळे सर्वांच्या कुटुंबीयांना सूचना देण्यात आली.तर बाल मजुरीसाठी नेणाऱ्या आरोपी पंकज व बोलाविणारा पिंटू कोरडे व ठेकेदार कुलदीपसिंह राजपूत यांना ताब्यात घेऊन कारवाईसाठी जीआरपी गोंदियाच्या सुपूर्द करण्यात आले.