मटका, जुगार अड्ड्यावर छापा, 3 लाख 57 हजारांचा मुद्देमाल जप्त

0
29

बुलडाणा,दि.30 :  जिल्ह्यातील अवैध धंद्याचे माहेरघर बनलेल्या खामगावात उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाने 29 मे रोजी औद्योगिक वसाहतीमधील एका मोठ्या बुकीचा वरली मटक्‍यांचा जुगार अड्डा उध्वस्त केला. या कारवाईत 3 लाख 57 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.जिल्हा पोलिस अधिक्षक शशिकुमार मीना, अप्पर पोलिस अधिक्षक श्‍याम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकाने गोपनिय माहितीवरून शिवाजी नगर पोलिस स्टेशन हद्दीतील औद्योगिक वसाहतीमधील मोठ्या बुकीच्या जुगार अड्यावर छापा टाकला. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करून जुगार अड्डा चालवित असलेल्या 12 जणांना अटक करण्यात आली. त्यामध्ये राजकुमार रामगोपाल राठी वय 55 रा. बालाजी प्लॉट, अजय अवधुत भगत वय 32 रा.आठोडी बाजार नांदुरा, नारायणदास सिताराम भुतडा वय 72 रा.पुरवार गल्ली खामगाव, मुकेश भास्करराव चव्हाण वय 35 अभय नगर खामगाव, अक्षय संजय मोरे वय 22 रा.काळेगाव तालुका खामगाव, विठ्ठल महादेव राहणे वय 35 रा. स्नेहल नगर वाडी, समिर महेंद्र मंत्री वय 39 बारादरी खामगाव, योगेश नंदकिशोर हिवराळे वय 30 दालफैल खामगाव, पंकज विनोद सोमानी वय 39 रा.शामल प्लॉट खामगाव, राकेश श्रीराम हिरवाने वय 42, राजेंद्र मदनलाल हिनवाने वय 47 दाल फैल खामगाव, प्रकाश नामदेव इंगळे रा. काळेगाव ता.खामगाव अशा 12 आरोपींचा समावेश आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक रूपेश शक्करगे, पोलिस कर्मचारी बालाजी महाजन, श्री.कोल्हे, रविंद्र इंगळे, सुधाकर थोरात, नितीन भालेराव, रतन गिरी, राम धामोडे, विनायक मानकर, विक्रम राठोड, सैय्यद जावेद, सुनिल बायनडे, गवारगुरू यांनी केली.