नक्षल सेलचे सहा.फौजदार ब्रिजभानसिंग सोमवंशी विनयभंगासह अट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

0
8

गोंदिया,दि.०२ःगोंदिया जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयातील नक्षल सेल विभागात कार्यरत सहाय्यक फौजदार ब्रिजभानसिंग त्रिभुवनसिंग सोमवंशी(रा.आंबाटोला/फुलचूर)यांच्याविरुध्द त्यांच्याच घरात गेल्या सहा वर्षापासून घरकाम करणाèया आदिवासी महिलेचा विनयभंग व जबरीसंभोग केल्याप्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात सदर पिडीतेच्या तोंडी तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर असे की गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील अल्लीटोला निवासी असलेली पिडीत २२ वर्षीय मुलगी गेल्या सहा वर्षापासून सहाय्यक फौजदार यांच्याघरी आंबाटोली/ शिवनगर, फूलचूर येथील घरी राहत होती.ती या दरम्यान घरकाम करायची.घरकाम करीत असताना आरोपीने अनेकदा पिडीत मुलीच्या इच्छेविरुद्द विनयभंग व संभोग करण्याचा प्रयत्न केलेला आहे.घटनेच्या दिवशी म्हणजे १ जून रोजी सुध्दा अशाचप्रकार केल्याने सदर २२ वर्षीय पिडीत मुलीला असहाय्य झाल्याने तीने गोंदिया ग्रामीण पोलीसठाण्यात धाव घेतली.त्यानंतर गोंदिया पोलीस दलात एकच खळबळ उडाली.वाèयासारखी ही बातमी पोलीस मुख्यालयाच्या बाहेर पसरल्याने प्रकरण दाबण्यासाठी होत असलेले प्रयत्न निष्पळ झाल्याने पिडीतेच्या तोंडी तक्रारीवरून अखेर गोंदिया ग्रामीणचे पोलीस निरिक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांनी भादंवी कलम २१७ २०१८ कलम ३७६(२)(फ)(एन)५०६ सहकलम ३(२)(५) अ.ज.जा.प्र.का.नुसार गुन्हा दाखल केला आहे.सदर प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्याकडे असून ते तपास करीत आहेत.
पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवंशी हे गेल्या १० ते १२ वर्षापासून गोंदिया पोलीस अधिक्षक कार्यालयातच कार्यरत आहेत.विशेष करुन नक्षलसेलमध्येच ठाण मांडून बसले होते.एकच अधिकारी एवढे वर्ष कसे काय त्या विभागात काम करीत बसला यावरही आत्ता चर्चांना उधाण आले आहे.