देवरी नगरपंचायतमध्ये अग्निशमन वाहन दाखल

0
8

देवरी,दि.02ः- येथील ग्रामपंचायत देवरीचे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाल्यानंतर सुरुवातीचे एक वर्ष निधी अभावी व अधिकारी अभावी रखडलेला देवरी शहराचा विकास मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांच्या नियुक्तीनंतर वेगाने सुरू झाले. त्याचाच एक भाग म्हणजे देवरी नगरपंचायतीमध्ये दाखल झालेले अग्निशमन वाहन होय.
जिल्ह्यात देवरी व्यतिरिक्त २0१५ मध्ये, गोरेगाव, सडक अजुर्नी, अजुर्नी मोरगाव, सालेकसा या ठिकाणी सुद्धा नगरपंचायतीची स्थापना झाली होती. या सर्व नगरपंचायतीमध्ये शहरातील नगारकिांना जिल्ह्याती अग्निशमन सेवा देणारी देवरी ही पहिली नगरपंचायत ठरली आहे. हे विशेष.तत्कालीन नगराध्यक्ष सुमन बिसेन यांच्या कार्यकाळात त्यासाठी उचलण्यात आलेले पाऊल महत्वाचे ठरले.
गोंदिया शहरातील एका हॉटेलमध्ये आग लागल्यानंतर तत्कालीन जिल्ह्याधिकारी अभिमन्यु काळे यांनी आग प्रतिबंधक उपकरणाला विशेष महत्व देत जिल्हा विकास निधी अंतर्गत प्राप्त अग्निशमन व आणीबाणी सेवा बळकटीकरण योजनेमध्ये गोंदिया जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायतींना २.५ कोटी रुपये निधीची तरतुद केली. त्यापैकी नगरपंचायत देवरीला १७ लाख ४५ हजार रुपये निधी प्राप्त झाले. परंतु, हा निधी अग्निशमन वाहनाकरीता अपूरा असल्याने लागणारा उर्वरित निधी १४ व्या वित्त आयोग निधीतून व्यर्थ करण्याचा ठराव नगरपंचायत देवरीने सर्वसाधारण सभेत घेतला. यानंतर मुख्याधिकारी राजेंद्र खिलखुंदे यांनी शिघ्रप्रगतीने नियोजन करून अवघ्या दोन महिन्यात तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी आणि निविदा प्रक्रिया पार पाडून लवकरात लवकर अग्निशमन वाहन देवरी शहरात दाखल होईल याची पुरेपूर काळजी घेतली.
२९ मे रोजी नगर पंचायत देवरी येथे नवनियुक्त अध्यक्ष कौशल्याबाई कुंभरे, नवनियुक्त उपाध्यक्ष आफताब उर्फ अन्नुभाई शेख, माजी अध्यक्ष सुमनताई बिसेन, माजी उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, महिला व बालकल्याण सभापती सौ. सिताबाई रंगारी, नगरसेवक यादोराव पंचमवार, संजय उईके, नगरसेविका माताताई निर्वाण व नगर पंचायतचे सर्व कर्मचार्‍यांच्या उपस्थित या अग्निशमन वाहनाचे लोकार्पण करून प्रात्याक्षीक घेण्यात आले.