विद्युत तारेच्या स्पर्शाने रानगवा ठार

0
73

सडक अर्जुनी,दि.03ः-जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार हमखास बघावयास मिळतो. परंतु, काही शिकारी वन्यप्राण्यांना विद्युत तारा लावून आपले भक्ष करीत असतात. जिल्ह्यात विद्युत तारेच्या स्पर्शाने वन्यप्राण्यांचे मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अशाचत सडक अजुर्नी तालुक्यातील रेंगेपार सहवनदोग बीट कन्हारपायली/सालईटोला येथे आरोपी सुभाष इंदल काटेवार (४0) याने लावलेल्या विद्युत तारेत एक भला मोठा रानगवा अडकून मृत्यू झाल्याची घटना २९ मे रोजी निदर्शनास आली. वनविभागाने चौकशी केल्यानंतर आरोपी सुभाष काटेवार याला अटक करून पुरावा नष्ट करणारे साहित्य ही ताबात घेतले आहे.
सविस्तर असे की, रेंगेपारसह वनदोग बीट कन्हारपायली/ सालईटोला येथे आरोपी सुभाष याने वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी शेतात विद्युत तारे लावून ठेवली होती. या तारेत रानगवा अडकला व त्याचा मृत्यू झाला. ही बाब आरोपी सुभाषच्या लक्षात आल्यानंतर त्याने आपल्या सहकार्‍याच्या माध्यमातून एका ट्रॅक्टर ने त्या रानगवाला ओढून संरक्षीत वन क्र. १५६९ च्या नालीत फेकून दिला. ही बाब वनविभागाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चौकशी केली असता रानगवाचा मृत्यू विद्युत तारेच्या स्पधार्ने होऊन आरोपी ने पुरावा नष्ट करण्यासाठी रानगवाला तिथे फेकल्याचे स्पष्ट झाले.
चौकशी वरून वनविभागाच्या अधिकारी सहा. वनसंरक्षक एम.आर. शेख, वनक्षेत्राधिकारी जी.एस. राठोड यांच्या मार्गदर्शनात क्षेत्रसहा. प्रमोद फुले, क्षेत्रसहा. सुनिल खांडेकर, रमेश कारबांधे, वैष्ठलाश भोयर, देवानंद कोसबे, डी.पी. मुंगलमारे, कु. संगीता काटेवार, शिवशंकर बघेले, जागेश्‍वर भोंडे, भरत बहेकार, केवळराम कापगते, मुलचंद मडावी, रमेश मेर्शाम आदींनी आरोपी सुभाष इंदल काटेवार (४0) रा. कन्हारपायली याला पकडण्यात यश मिळविले. रानगवाच्या शवविच्छेदन पशुधन विकास अधिकारी डॉ. वाघाये यांनी केले. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी वनकायद्यांतर्गत गुन्हाची नोंद करून ४ जूनपयर्ंत आरोपीविरुद्ध वनकोठडी घेतली आहे.