एल्गार परिषदेत माओवाद्यांचा पैसा: पुणे पोलिस

0
8

पुणे दि.७:: पुण्यात शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेसाठी  माओवाद्यांचा पैसा वापरण्यात आला. त्यामध्ये माओवाद्यांचा हात होता, अशी माहिती पुणे पोलिसांकडून आज देण्यात आली.एल्गार परिषद झाल्यानंतर कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उफाळला होता. पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करून कोरेगाव भीमामधील दंगलीस चिथावणी दिल्याचा आरोप ठेवत रिपब्लिकन पॅंथर्सचे सुधीर ढवळे यांच्यासह पाच जणांना बुधवारी अटक करण्यात आली. पुणे पोलिसांच्या पथकाने मुंबईतील गोवंडी भागातून ढवळे यांना बुधवारी पहाटे ताब्यात घेतले. त्यापाठोपाठ नागपूर येथून ऍड. सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन आणि महेश राऊत यांना, तर दिल्लीतून रोनी विल्सन यांना अटक करण्यात आली. आरोपी अॅड. सुरेंद्र गडलिंग यांना १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. या प्रकरणी आज (गुरुवार) पुणे पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

कदम म्हणाले, की माओवाद्यांचा पैसा एल्गार परिषदेच्या आयोजनासाठी वापरण्यात आला. आरोपीच्या संगणकातून माओवाद्यांशी संबंधित माहिती मिळाली आहे. जप्त करण्यात आलेल्या डॉक्युमेंटपैकी एक असा डॉक्युमेंट आहे, ज्यात काही रेफ्रेंसेस प्रकाश आंबेडकर आणि शोभा सेनचे आहेत. रोनी विल्सनच्या लॅपटॉपमधून मिळाले हे डॉक्युमेंट. माओवादी कमिटीचा मुख्य मिलिंद तेलतुंबडे यांनी रोनी विल्सनला हे लिहिले आहे. माओवादी शहरी भागात विद्यार्थ्यांना टार्गेट करत आहेत. सीपीआय माओवादी संघटनेचे आयडॉलॉजिकल लीडर बनविण्यासाठी शहरी भागात विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे.