महिला कॉन्स्टेबलच्या मुलीचा पोलिस उपायुक्तांवर बलात्काराचा आरोप

0
10

औरंगाबाद,दि.27 : पोलीस हे कायद्याचे रक्षक असतात परंतु जेव्हा तेच, कायद्याचे उल्लंघन करतात तेव्हा ते रक्षक न राहता भक्षक बनत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत असलेल्या एका महिलेच्या २२ वर्षीय मुलीला, एमपीएसी परीक्षेचे मार्गदर्शन करतो असे आमिष दाखवून, पोलिस उपायुक्तांनी तिला घरी बोलावले व तिच्यावर बलात्कार केल्याची गंभीर आणि खळबळजनक घटना, समोर आली आहे. या प्रकरणी पीडितेने व्हाट्सअॅप वरून पोलिसांत तक्रार दिली आहे.
परीमंडळ २ चे उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.