वाशिममध्ये युवकाची आत्महत्या!

0
11

वाशिम,दि. २७ : स्थानिक बसस्थानक परिसरात असलेल्या रॉयल पॅलेस हॉटेलमधील एका खोलीत गणेश अशोक वानखेडे (वय ३२ वर्षे, रा. गव्हा, ता. मानोरा) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २७ जून रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी गणेशने ह्यसुसाईड नोटह्ण लिहून ठेवली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र, त्यामधे नेमका काय मजकूर लिहिलेला आहे, हे अद्याप कळू शकले नाही.