आमगाव येथे पोलिस पाटलांची कार्यशाळा

0
13

आमगाव,दि. २७ : येथील नगरपंचायतीच्या सभागृहात पोलिस पाटलांचीकार्यशाळा तसेच सेवानिवृत्त पोलिस पाटलांचा सत्कार कार्याक्रम घेण्यात आला. कार्यशाळेचे उद्घाटन पोलिस निरीक्षक एस.डी.दसूरकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर होते.प्रमुखपाहुणे म्हणून जिल्हाध्यक्षदिलीप मेश्राम,
उपाध्यक्ष रमेश बांभरे, सचिव राजेश बन्सोडे, कोषाध्यक्ष श्रीराम झिंगरे, जिल्हा महिला अध्यक्ष नंदा ठाकरे,उपाध्यक्ष अनिता लंजे, उपशाखा अध्यक्ष लोकचंद भांडारकर, चंद्रहास भांडारकर, प्रकाश कठाणे, गजानन जांभूळकर,बकाराम कापगते, माधोराव शिवणकर, परिमल ठाकुर उपस्थित होते. पोलिस निरीक्षक दसुरकर म्हणाले, काळानुसार समाज
व्यवस्था बदलत चालली असून, गुन्ह्याच्या तपासात समाजाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. गावपातळीवर शासनास सहकार्य करणारा व्यक्ती म्हणून पोलिस पाटलांची निवृती झाली जाते. काळानुसार कायद्यात सुधारणा होत असल्याने पोलिस पाटलांना पशिक्षणाची आवश्यकता भासू लागली आहे. यावेळी सेवानिवृत्त पोलिस पाटील हिरालाल रिनाईत,माणिकलाल टेकाम, श्रीमद नागपुरे यांचा शाल, श्रीफळ व सन्माचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन राजेश बन्सोड यांनी केले. आभार व्ही.एम.साखरे यांनी मानले.कार्यक्रमासाठी राजेश फुंडे, ओमप्रकाश हत्तीमारे, बहादूर टेंभरे, इंद्रकुमार रहांगडाले,राजकुमार बिसेन, संजू पुंड,सुखदेव गायधने, रमेश नकर,योगेश्वरी बोकडे, शिवलाल शहारे, शीला रहिले, सरिता मेंढे आदींनी सहकार्य केले.