मुकबधिर तरुणाची फसवणूक

0
9

मौदा,दि.13ः- पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा भुगाव येथे एका मुकबधिर तरुणाच्या असाहयतेचा फायदा घेत फसवणूक करण्याचा प्रकार उघड़कीस आला आहे. वरनभा कामठी येथील किशोर ऊके वय 28 हा मुकबधिर असून त्याचे लग्न झाले होते.आरोपी राधेश्याम बारई रा, भुगाव याने किशोरच्या घरी जाऊन त्याला  समाजकल्याण विभाकडून मिळणारे 50 हजार रुपये मिळवून देतो, असे सांगत त्याच्यकडूंन कागदपत्रे घेऊन अर्जावर सह्या घेतल्या. तसेच किशोरला समाज कल्याण कार्यालयात नेऊन तेथून 25 हजार रूप्याचा घनादेश हस्तगत करून श्रीराम बिगर शेती पतसंस्थेत  बैंक खाते उघडायला लावले. त्यानंतर आरोपीने चेक वटवून स्वतः बैंकेतुन 25 हजार काढले त्यातील 11 हजार फिर्यादिला दिले, आणि 14 हजार स्वतः ठेवले. या प्रकरणी किशोर ऊके यांच्या तक्रारीवरुन मौदा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आरोपीचा शोध सुरु असून पुढील तपास पोलिस का, देशमुख करत आहे,