आदिवासी विकास प्रकल्पात कोट्यवधींचा घोटाळा

0
13

नागपूर,दि.16ः- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात झालेल्या घोटाळयात नवृत्त न्यायाधीशाद्वारे करण्यात आलेल्या तपासानंतर रविवारी सीताबर्डी पोलिसांनी २ अधिकार्‍याविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. तपासादरम्यान विभागात २ कोटी ८३ लाख रुपयांचा घोटाळा उघड झाला आहे. पोलिसांनी आदिवासी विकास विभागाचे अधिकारी नितीन इसोकर (३५) यांच्या तक्रारीवर गुन्हा नोंदविला आहे. आरोपींमध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमुर रहिवासी केशव बावनकर (५२, रा. नागपूर) व नवृत्त प्रकल्प अधिकारी दामोदर टी. वासनिक (६५) यांचा समावेश आहे.
यात उल्लेखनीय असे की, वर्ष २00४ ते २00९ दरम्यान एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत आदिवासी भागात राहणार्‍या नागरिकांसाठी पीव्हीसी पाइप वाटणे, विहिरी बनविणे, गाय व म्हशीचे वाटप करणे, एमएससीआयटी प्रशिक्षण, सिलाई मशीन, सायकलचे वाटप, कीटनाशक वाटणे आदींसह विविध प्रकारच्या योजना चालविण्यात आल्या. या योजनेचा लाभ गरजूंना न मिळाल्याने हे प्रकरण उघड झाले. तक्रारीनंतर कोणतेही कारवाई करण्यात आली नाही. म्हणून वर्ष २0१२ मध्ये उच्च न्यायालयात या प्रकरणी तातडीने व बारीकपणे तपास करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नवृत्त न्यायाधीश एम.जी. गायकवाड. यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करून याप्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले होते. गायकवाड यांनी आदिवासी विकास विभागाच्या वेग-वेगळया कार्यालयात जाऊन ५ वर्षांत करण्यात आलेल्या कामांची माहिती घेतली. सर्व संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांचे बयाण नोंदविण्यात आले. त्यांना आपली बाजू ठेवण्याची संधी देण्यात आली. तपासात संपूर्ण घोटाळा समोर आला.