खामगावात पकडला एक क्विंटल गांजा

0
15

खामगाव दि.२३:-: आॅटोतून गांजाची तस्करी केल्या जात असल्याच्या गुप्त माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने राष्ट्रीय महामार्गावर सिनेस्टाईल पाठलाग केला. यामध्ये आॅटोसह सुमारे १ क्विंटल गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई राष्ट्रीय महामार्गावरील एमआयडीसी टर्निंगवर करण्यात आली. या कारवाईमुळे खामगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.ताराचंद नारायण आठवले (४६), रा. सतीफैल, सुरेश लालचंद पवार (३४), लखन दुर्योधन चव्हाण (२२), अजय सुरेश पवार(१६), लालचंद परबत पवार (६०),  लीला लालचंद पवार(५५), विनोद पंडित चव्हाण(३२) सर्व रा. जळका तेली, ता. खामगाव अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी मोटार सायकलवरील विनोद पंडित चव्हाण हा आरोपी मोटार सायकल घटनास्थळी सोडून फरार झाला. तर उर्वरीत सहाही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. मोटार सायकलीवर मागे बसलेल्या लालचंद पवार यालाही पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले.
अकोला येथून नांदुरा येथे एका आॅटोतून गांजाची वाहतूक केल्या जात असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाला मिळाली.  या माहितीच्या आधारे एसडीपीओ पथकाने पाठलाग केला असता, तत्पूर्वीच एम एच २८ टी- ७१८ हा आॅटो घाटपुरी टर्निंग जवळून पुढे निघून गेला.  त्यामुळे एसडीपीओ पथकाने संशयीत आॅटोची माहिती एमआयडीसी टर्निंग पाँईटवर तैनात असलेल्या नापोकॉ किरण राऊत आणि पोकॉ राहुल इंगळे यांना दिली. या माहितीच्या आधारे शिवाजी नगर पोलिसांनी आॅटो थांबवून झाडाझडती घेतली. तेवढ्यात उपविभागीय पोलिस अधिकारी पथकही घटनास्थळी पोहोचले. यावेळी एक महिला आणि ४ पुरूष  आॅटोतून  गांजा घेवून जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी आॅटोसह आॅटोतून नांदूरा येथे नेल्या जाणारा गांजा जप्त केला. त्याचवेळी आॅटोसमोरून जात असलेल्या दुचाकीवरील दोघांपैकी एक जण दुचाकीसोडून पसार झाला. रस्ता साफ असल्याचा इशारा या दुचाकीवरूनच आॅटोला दिल्या जात होता.  एमएच २८ बीडी ०१२९ क्रमांकाच्या दुचाकीचा वापर गुन्ह्यासाठी करण्यात आल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाने ही दुचाकीही ताब्यात घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात एपीआय अमर चोरे, पीएसआय बोरसे, हेकॉ. सुनिल राऊत, नापोकॉ राऊत, प्रदीप मोरे, थोरात, देवेंद्र शेळके, सुधाकर थोरात, रविंद्र कन्नर, विशाल कोळी, सुनील बैनाडे, गोपाल वरूडकार यांनी ही कारवाई केली. शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले घटनास्थळी पोहोचले होते.