डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू

0
22

ब्रम्हपुरी,दि.02ः-एका गर्भवती महिलेला ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे प्राण गमवावे लागल्याची घटना ब्रम्हपुरी येथे दि.२९ सप्टेंबरच्या पहाटे घडली.
चिखलगाव येथील रहिवासी प्रीती प्रकाश नाकतोडे (३१) ह्या गर्भवती महिलेला २९ सप्टेंबरच्या दुपारी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले तेव्हा ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्रसूती करण्यासाठी भरती करण्यात सांगितले. डॉक्टरांनी तपासणी करून इंजेक्शन लिहून दिले परंतु लिहून दिलेले इंजेक्शन ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे ते इंजेक्शन नातेवाईकांनी बाहेरून घेऊन आणले त्यानंतर हे इंजेक्शन दुपारी ३ च्या सुमारास त्या महिलेला देण्यात आले त्यानंतर उशिरा प्रसूती कळा सुरू झाल्या मात्र प्रसूती झाली नाही त्यावेळी उपस्थित आशा वर्कर यांनी कर्तव्य बजावत असलेल्या नर्सला विचारणा केली तेव्हा नर्सनी अगदी सुरळीत प्रसूती होईल, असे सांगितले.परंतु झाले मात्र उलट रात्री १ वाजता प्रसूती तर झालीच नाही मात्र प्रकृती गंभीर होऊन गर्भवती मूच्र्छित पडली लगेच औषधोपचार केल्यानंतर काही वेळाने ठीक झाली.
पहाटेला मात्र काही कळायच्या आत त्यांची प्रकृती अधिकच खालावली त्यावेळी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी गर्भवती महिलेला दुसरीकडे हलविण्याचा सल्ला दिला. त्वरित त्या महिलेला नातेवाईकांनी ख्रिस्तानंद रुग्णालयात हलविले तेव्हा तेथील डॉक्टरांनी सदर गर्भवती महिलेला मृत घोषित केले.सदर गर्भवती महिलेला एक सात वर्षाची मुलगी आहे.
दरम्यान, ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच माझ्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप गर्भवती महिलेचा पती प्रकाश नाकतोडे यांनी केला आहे