रस्त्यावर मंडप उभारणाऱ्या आठ मंडळावर गुन्हा दाखल,नगराध्यक्षांचाही समावेश

0
15

गोंदिया,दि.25 :वाहतुकीच्या  रस्त्यावर शासकीय नियमांना बगल देत शारदा व दुर्गादेवीचे मंडप थाटून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाºया आठ मंडळाच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्सवापूर्वी पोलिसांनी रस्त्यावर मंडप उभारू नका अशा सूचना केल्या होत्या. यामध्ये गोंदिया शहराचे नगराध्यक्ष अशोक इंगळे  व राष्ट्रवादीचे पदाधिकारी नानू मुदलियार यांचाही समावेश आहे.या मंडपामुळे नवरात्रोत्सव काळात सामान्य व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागला होता.
शहराच्या इंगळे चौकात ३ ते १९ आॅक्टोबर दरम्यान सार्वजनिक दुर्गा मांडून वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे मंडळाचे अध्यक्ष तथा गोंदिया नगर परिषदेचे नगराध्यक्ष अशोक इंगळे (४५) रा. सिव्हील गोंदिया यांच्यावर सरोज घरडे यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम २८३, २९१, १८८ सहकलम १०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
कन्हारटोली येथील दुर्गा उत्सव समितीने रस्त्याचा एक तृतीयांश भाग रस्त्यावर घेतल्यामुळे त्या मंडळाचे अध्यक्ष बालाजी चुन्नीलाल नागपुरे (४०) रा. कन्हारटोली याच्या विरूध्द भादंविच्या कलम २८३, २९१, १८८ सहकलम १०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुनाटोली येथील दुर्गा उत्सव समितीने रस्त्याचा एक तृतीयांश भाग रस्त्यावर घेतल्यामुळे मंडळाचे अध्यक्ष मोहनलाल अडवानी (२७) रा. पुनाटोली याच्यांविरूध्द भादंविच्या कलम २८३, २९१, १८८ सहकलम १०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.कन्हारटोलीतीलच दुर्गा उत्सव समितीने रस्त्याचा एक तृतीयांश भाग रस्त्यावर घेतल्यामुळे त्या मंडळाचा अध्यक्ष कमल कालीपत चक्रवर्ती (५२) याच्याविरूध्द भादंविच्या कलम २८३, २९१, १८८ सहकलम १०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.या सर्वांना दुर्गा देवीचे मंडप नियमाप्रमाणे बनविण्याकरीता १४९ जाफौनुसार नोटीस बजाविण्यात आले होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करुन मंडप उभारले होते.
जय मॉ दुर्गा समिती मामा चौक गोंदिया यांनीही पोलीसांचे न ऐकता रस्त्यावर मंडप उभारून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. त्यामुळे नानू मुदलीयार (५०) रा. मामा चौक गोंदिया याच्याविरूध्द गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम २८३, २९१, १८८ सहकलम १०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मनोहर चौक शारदा उत्सव मंडळ समिती मनोहर चौक जयस्तंभ चौक गोंदिया येथे स्थापन करण्यात आलेले दुर्गा देवीचे मंडप रस्त्यावर उभारण्यात आले. त्यांनी न रस्त्यावर मंडप उभारून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. त्यामुळे लाल साकला राठी रा. बजरंग नगर गोंदिया याच्याविरूध्द गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम २८३, २९१, १८८ सहकलम १०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ गांधी प्रतिमा गोंदिया येथे स्थापन करण्यात आलेल्या दुर्गा देवीचे मंडप रस्त्यावर उभारण्यात आले. उत्सवापूर्वी पोलिसांनी रस्त्यावर मंडप उभारू नका अशा सूचना केल्या होत्या. परंतु त्यांनी न ऐकता मंडप उभारून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. त्यामुळे सुनील अग्रवाल रा. गांधी प्रतिमा गोंदिया यांच्याविरूध्द गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम २८३, २९१, १८८ सहकलम १०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.याठिकाणी तर वाहतुक पुर्णत विस्कळीत स्वरुपातच झालेली होती.भवानी चौक गोंदिया येथे पोलिसांनी रस्त्यावर मंडप उभारू नका अशा सूचना केल्या होत्या. परंतु त्यांनी न ऐकता मंडप उभारून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. त्यामुळे ईश्वर शिवलानी राठी रा. शंकर चौक सिंधी कॉलनी गोंदिया याच्याविरूध्द गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम २८३, २९१, १८८ सहकलम १०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.