देऊळगावचा तलाठी २०,००० रुपये लाच घेतांना अटक

0
11

गडचिरोली,दि.३०ः- रेती घाटाचे कंत्राट असलेल्या कंत्राटदाराचे रेती वाहतूक करणारे ट्रक पकडल्यानंतर कारवाई न करता सोडून देण्यासाठी 20 हजारांची लाच स्वीकारताना आरमोरी तालुक्यातील देऊळगाव येथील तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. मोतीलाल लहुजी राऊत असे लाचखोेर तलाठ्याचे नाव आहे.तक्रारकर्ता हा रेती कंत्राटदार असून रेती घाटावरून त्याच्या ट्रकने रेती वाहतूक करण्यात येत होती. तलाठी राऊत यांनी सदर ट्रक पकडल्यानंतर  त्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी तक्रारकर्त्यास एक लाख रूपयांची मागणी केली. तडजोडीअंती ८० हजार रूपये पुढील तीन महिन्यात कोणत्याही प्रकारची कारवाई न करण्याकरिता ४० हजार अशी एकूण १ लाख २० हजार रूपये लाचेची मागणी तलाठ्याने तक्राकर्त्याकडे केली. मात्र तक्रारकर्त्यांची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाच-लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीवरून लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी सापळा रचून तक्रारकर्त्यांकडून पहिला म्हणून २० हजारांची लाच स्वीकारताना तलाठी मोतीलाल राऊत यास आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावरील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या समोर रंगेहात अटक केली. याबाबत आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्ष्क राजेश दुध्धलवर, पोलिस उपअधीक्षक विजय माहूरकर, डी. एम. घुगे यांच्या मार्गदर्शन पोलिस निरीक्षक रवी राजुलवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक मोरेश्वर लाकडे, नायक पोलिस शिपाई सतीश पत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, देवेंद्र लोनबले, महेश कुकुडकर, सोनल आत्राम, चालक तुळशिराम नवघरे यांनी केले.