मानेगांव येथे साहित्यिकांचा नागरी सत्कार

0
14
आमगांव,दि.११ःः:  झाडीबोली साहित्य मंडळ,गावकरी व ग्रामपंचायत मानेगांव यांच्यावतीने सरपंच सौ.सुनंदाताई ऊके,पोलिस पाटील संजय पुंडे यांच्यहस्ते  मुंडिकोटा येथे होणाऱ्या २६ व्या झाड़ीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक मिलिंद रंगारी तसेच जेष्ठ साहित्यिक पांडुरंग भेलावे या दोघांचा नागरी सत्कार ग्रामपंचायतच्या सभागृहात करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष ग्रामपंचायत मानेगावचे सरपंच सौ.सुनंदाताई ऊके, प्रमुख पाहुणे म्हणून  उपसरपंचअरुण मानकर,पोलिस पाटील संजय पुंडे, जोगेंद्र टेंभरे, एम.के.पुंडे, योगेश पारधी,सेवा सहकारी संस्थाध्यक्ष कैलाश रहांगडाले,जंगल अधिकारी निरंजन चौधरी,डॉ. के.बी.राणे, माजी सरपंच सौ.ललिताताई परतेती, मीराबाई रंगारी  सत्कारमूर्ति मिलिंद रंगारी व पांडुरंग भेलावे उपस्थित होते.शारदा मातेच्या छायाचित्राचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात झाली.
मानेगावच्या मातीतून दोन साहित्यिक घडले ही बाब सर्व गावासाठी आभीमनाची असल्याचे मत आपल्या प्रास्ताविकातुन साहित्य मंडळाचे सुकदेव पुंडे यांनी मांडले,मराठी भाषेचा उगम व झाड़ीबोली विषयी माहिती प्रा.सुजीत रंगारी यांनी दिली, माजी सरपंच सी.एच. भलावी,मंडळाचे देवचंद पुंडे यांनी मनोगत व्यक्त केले
 सत्काराला उत्तर देताना मिलिंद रंगारी यांनी गावकरी मंडळीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सहित्याचा वारसा नवीन पिढीने जोपसन्याचे आवाहन केले तसेच अत्यंत कठीन प्रसंगातून साहित्याचा प्रवास पार केल्याचे पांडुरंग भेलावे यांनी सांगितले.आपल्या अध्यक्षीय भाषणातून सौ.सुनंदाताई ऊके यांनी मुंडिकोटा येथे होणाऱ्या संमेलनास शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे संचालन राजेन्द्र पुंडे यांनी केले व आभार रामदयाल गौतम यांनी मानले.कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी विठोबा मेंढे,पूरनलाल ठाकुर,नेकचंद पुंडे, अनिल मेश्राम,खेमचंद पुंडे, होलीराम मांडवे,डॉ. एन. एम.पुंडे, रमेश श्रीपत्रे,प्रकाश मेश्राम,गुजर ताई, कांबळे ताई,नीरज मानकर,मंडळचे पदाधिकारी व गावकरयानी परिश्रम घेतले.