ॲट्रॉसिटीअंतर्गत ८ व्यक्तींवर गुन्हा दाखल

0
15

लाखनी,दि.24 : येथील प्रभाग क्र. १ मध्ये वास्तव्यास असलेल्या एका प्रतिष्ठीत कुटुंबास शेजारील कुटुंबाने टाकाऊ पदार्थ प्रवेशद्वारावर टाकून अश्लील जातिवाचक शिवीगाळ करून पतीस जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी ॲट्रॉसिटी अंतर्गत ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

हुमने व आगलावे परिवार एकमेकाचे शेजारी राहतात. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता फिर्यादी प्रिया हुमणे घरी एकटी असताना चेतना आगलावे हिने आपल्या घरातील भाजीपाला व शिळे अन्न फिर्यादीचे प्रवेशद्वारावर टाकून फिर्यादीस अश्लील व जातीवाचक शिवीगाळ केली. २८ ऑक्टोबर रोजी फिर्यादीचे घरी एक सामाजिक संघटनेची बैठक असताना संघटनेच्या सदस्यांनी घरासमोरील रस्त्यावर कडेला मोटार सायकली ठेवल्य असता आपल्या गाड्या उचला असे बोलून अश्लिल शिवीगाळ केली व फिर्यादीचे पतीस जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी ही अनुसूचित जातीची असल्याचे माहित असताना सुद्धा आरोपींनी मागील ४ वर्षापासून संगनमत करून घरासमोर मेलेले उंदिर टाकणे, प्रवेशद्वाराचे भिंतीला लागून जनावरांची विष्ठा साठवून ठेवणे असे किळसवाने उपद्व्याप सुरू होते. हा सर्व प्रकार असह्य झाल्याने प्रिया हुमणे हिचे तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक ३०२/१८ अन्वये चेतना आगलावे, रतीराम आगलावे, महेश आगलावे, सोनुली आगलावे, लोकेश आगलावे, विक्की आगलावे, उमेश आगलावे, शोभा आगलावे सर्व रा. लाखनी यांच्यावर कलम २९४, ५०४, ५०६, भांदवि तथा अनुसचित जाती जमाती प्रतिबंधक कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, पोहवा दयाराम नवखरे, पोनि दामदेव मंडलवार, सहाफौ. भगवान थेर करीत आहेत. वृत्त लिहिपर्यंत आरोपीस अक केली गेली नव्हती.