२७ नोव्हेंबरला लिपिकांचा मुंबईत महाएल्गार

0
14
गोंदिया,दि.२४: सहाव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी सातव्या वेतन आयोग पुर्वी सुधारित करुन मिळणे, डिसीपीएस, एनपीएस कर्मचाèयांना जुनी पेंशन सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करणे आदि मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय लिपीक संवर्गीय हक्क परिषदेच्यावतीने २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर महाएल्गार आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात गोंदिया जिल्ह्यातील लिपीक सहभागी होणार असल्याची माहिती गोंदिया जिल्हा परिषद पंचायत समिती लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हा सचिव गुणवंत ठाकूर यांनी दिली.
चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या अशा तीन वेतन आयोगात लिपीक संवर्गातील कर्मचाèयांच्या वेतनश्रेणीत तफावतमुळे अन्यायाची भावना लिपीक वर्गातून उमटत आहे. या अन्यायाच्या विरोधात राज्यातील शासकीय आणि निम शासकीय सेवेतील लिपीकांनी दंड थोपटले आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन महाराष्ट्र रााज्य शासकीय, निमशासकीय लिपीक संवर्गीय हक्क परिषदेची स्थापना केली आहे. महाराष्ट्रातील सर्व लिपीक एक होवून शासनाविरुद्ध महाएल्गार क्रांती आंदोलन २७ नोव्हेंबर २०१८ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे करण्यात येणार आहे. त्याबाबतचा ठराव पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय लिपीक संवर्गीय हक्क परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये घेण्यात आला. त्यानुसार शासनास नोटीस देखील देण्यात आलेली आहे.
मागील ३० वर्षापासून वेतन त्रुटी करण्याबाबत अनेक विभागातील कर्मचारी संघटनांनी या अन्यायाविरोधात शासन दरबारी मागण्या मांडून सातत्याने न्याय मिळण्यााचा प्रयत्न केला आहे. तथापी प्रकरणी शासनाने कोणतीही दखल न घेतल्याने विविध शासकीय निम शासकीय कार्यालयातील संघटनांनी उपरोक्त प्रमाणे महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय लिपीक संवर्गीय हक्क परिषदेची स्थापना करुन एकत्रीत लढा उभा केला आहे. त्यानुसार २७ नोव्हेंबरच्या महाएल्गार क्रांती आंदोलनात गोंदिया जिल्ह्यातील जास्तीत जास्त लिपीकवर्गीय कर्मचारी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय लिपीक संवर्गीय हक्क परिषदेच्यावतीने जिल्हा सचिव गुणवंत ठाकूर केले आहे.