एकतर्फी प्रेमप्रकरणात युवकाने केले युवतीवर चाकूने हल्ला,युवती गंभीरावस्थेत

0
22

चंद्रपूर,दि.२७ः- जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातंर्गत येत असलेल्या नंदारा येथील चेतन गजभे (वय २२) या युवकांने एकतर्फी प्रेमप्रकरणातून मुलीच्या अंगावर चाकुने वार करुन जखमी केल्याची घटना आज मंगळवारला(दि.२७)घडली.त्यानंतर सदर युवकाने विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.या घटनेतील जखमी मुलीला नागपूरच्या रुग्णालयात तर युवकाला चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मुलीच्या आईवडीलांनी मुलाच्या आईला लग्नास नकार दिल्याने संतप्त होऊन चेतन गजभे या युवकाने आज मंगळवारला सदर मुलगी ही आपल्या महाविद्यालयातून परत येत असताना गावाजवळ अडवून मारहाण केली.तसेच पॅंटच्या खिशातून चाकू काढून मुलीच्या अंगावर सपासप वार केल्याने रक्तबंबाळ झाली.त्या मुलीसोबत असलेल्या तिच्या मैत्रिणीने गावाकडे धाव घेत गावकर्यांना घटनेची माहिती दिली.त्यांनतर गावकर्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमीमुलीला रुग्णालयात हलवून पोलीसांना घटनेची माहिती दिली.याप्रकरणात युवकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून जखमी मुलीची प्रकृती मात्र गंभीर असल्याचे वृत्त आहे.