जिल्हयातील १६२ दृष्टीदोष मुलांची तपासणी

0
13
गोंदिया,दि.२७ः-दिव्यांग मुलांना अंधत्व शिक्षण घेताना व दैनंदिन जीवन व्यतीत करतांना अडथळा म्हणून समोर येऊ नये याकरिता ज्या मुलांना शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे.अशा मुलांकरीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात १६२ दृष्टीदोष मुलांची तपासणी करण्यात आली.शस्त्रक्रिया शिबिराला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यानी भेट देऊन पालकांशी संवाद साधला.यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रमोद खंडाते,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज राऊत,वरिष्ठ शल्य चिकित्सक डॉ.राजेन्द्र जैन,डॉ.सतीश जैसवाल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या मुलांची तपासणी नेत्र विभागाचे प्राध्यापक डॉ.राहुल डगवार,डॉ.प्रवीण धुवाधपरे,डॉ.चिन्मय शैलजा व डॉ निकिता पोयाम यांनी केली.या मुलामध्ये आमगांव तालुक्यातील २२,अर्जुनी/मोर २८९,देवरी २४,गोंदिया ३९,गोरेगाव१३,सड़क/अर्जुनी ९,सालेकासा ८ व तिरोड़ा तालुक्यातील १८ मुलांचा समावेश होता.शस्त्रक्रियेकरिता निवडण्यात आलेल्या मुलांच्या टप्प्या टप्प्यात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.आयोजनाकरिता दिव्यांग विभागाचे जिल्ह्या समन्वयक विजय ठोकने,कार्यक्रम समन्वयक संजय बिसेन यांनी काम पाहिले.तालुक्यातील दिव्यांग विभागाचे तालुका समन्वयक व विशेष शिक्षकांनी सहकार्य केले.