कंत्राटी कर्मचारी यांच्या प्रश्नांसंदर्भात शासन सकारात्मक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
34

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांच्या प्रश्नांसंदर्भात शासन सकारात्मक असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांच्याकडून देण्यात आलेल्या निवेदनात सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गतिमान आणि प्रगतिशील प्रशासन देण्यासाठी कर्मचाऱ्यांची आवश्यक आहे. राज्यात मंत्रालय आस्थापना, आयुक्तालय, संचालनालय, महामंडळे, स्थानिक स्वायत्त संस्था मध्ये अनेक अधिकारी व कर्मचारी कंत्राटी पद्धतीने चोख काम करत आहे. या कंत्राटी कर्मचारी यांच्या संदर्भात शासन सकारात्मक आहे असे ते म्हणाले. यावेळी म. रा. कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी निवेदन देताना म्हणाले की, संपूर्ण राज्यात 05 लाख कंत्राटी कर्मचारी आज मंत्रालय ते ग्रामपंचायत पर्यंत सर्व विभागात काम करत आहे. परंतु, त्यांना वेतन कमी, त्यात वेळेवर नाही, ठेकेदार कडून होणारी पिळवणूक तसेच अधिकाऱ्यांचा सतत वाढता दबाव आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशात सर्व कंत्राटी कर्मचारी यांना आहे त्या पदावर परमनंट करून नियमित करावे जेणेकरून त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न सुटेल. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देताना म. रा. कंत्राटी कर्मचारी महासंघ मंत्रालयीन साचिव शाहरुख मुलाणी यांच्या सह आ. निरंजन डावखरे, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, माजी आ. संदीप बाजोरिया उपस्थित होते.