सिव्हील लाईनस्थित एका क्रिकेट बुकीच्या घरावर छापा,बुकी ताब्यात ?

0
8

गोंदिया,दि.07ः-गोंदिया शहरातच नव्हे तर जिल्ह्यात क्रिकेट सामन्यादरम्यान सट्टा व्यवसाय चालविणारे मोठमोठे बुकी गोंदिया शहरात वावरत आहेत.ते बुकी मात्र पांढरपेशे असल्याने त्यांच्यावर कुणीही सामान्य नागरीक हे क्रिकेटचे बुकी असतील अशा कधीही विश्वास करणार नाहीत.अशाच एकापैकी शहरातील प्रशासकीय अधिकारी यांचेनिवासस्थान असलेल्या सिव्हीललाईन भागातील मागच्या गल्लीतील एका अमिन नामक क्रिकेटबुकीच्या घरावर आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महिला पोलीसासंसह छापा घातल्याचे वृत्त समोर आले आहे .छापा घातल्यानंतर त्या बुकीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत पोलीस अधिक्षक कार्यालयात नेऊन विचारपूस सुरु केली आहे.या बुकीच्या माध्यमातून पोलीस काय समोर आणते याकडे लक्ष लागले आहे.विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यापुर्वी भंडारा येथे नागपूरच्या पोलीसांनी जेव्हा क्रिकेट सामना सुरु असताना एका घरावर छापा मारला होता.त्यावेळी सुध्दा पकडण्यात आलेल्या काही आरोपीमध्ये गोंदियातील एका बुकीचा समावेश होता अशी चर्चा आहे.गोंदिया शहरात बुकींची मोठी एक रिंग असल्याची चर्चा असून काहींनी तर आपला एक क्रमांकाचा व्यवयास असल्याचे दाखविण्यासाठी मोबाईलपासून तर कपड्यापर्यंत व तंबाखूपर्यंतचे व्यवसाय सुरु केल्याची चर्चा आहे.या चर्चेच्या आधारावरच गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका बुकीला आज शुक्रवारच्या सायकांळी 7 नंतर त्यांच्या घरावर छापा घालून ताब्यात घेतले आहे.मात्र पोलीसांनी अधिकृत अद्यापही माहिती जाहीर केलेली नाही.ज्या बुकीला ताब्यात घेण्यात आले आहे त्याच्या निवासस्थानापासूनच काही अंतरावर काही वृत्तपत्रांचे कार्यालय व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे शासकीय निवासस्थान असल्याची चर्चा आहे.