24.8 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home गुन्हेवार्ता विवाहित महिला हत्या प्रकरणात चौघे अटकेत

विवाहित महिला हत्या प्रकरणात चौघे अटकेत

0
27

आमगाव,दि.20ः- पोलिस हद्दीतील मांडोदेवी सूयार्देव देवस्थानापासून अर्धा किमी अंतरावर १४ डिसेंबर रोजी काजल इंद्रराज राऊत (२२), रा. सालईटोला या विवाहित महिलेचा गळा चिरुन खून करण्यात आला होता. याप्रकरणी आमगाव पोलिसांनी मृतक महिलेच्या भाऊजीसह तीन आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २४ डिसेंबरपयर्ंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. विशेष म्हणजे, यात दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे.
पोलिसांना प्राथमिक तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, काजल हिचे पाच महिन्यापूर्वी गोरेगाव येथील शहारे कुटुंबात लग्न झाले होते. परंतु वैवाहिक कलहातून तीन महिन्यातच काजल विभक्त होऊन माहेरी सालईटोला/बापूटोला येथे राहत होती. यादरम्यान तिचे भाऊजी नरेंद्र मेश्राम याच्यासोबत संबंध जुळले. परंतु काही दिवसाने त्यांच्यातील संबंध तुटल्याने नरेंद्र पुरुषोत्तम मेश्राम रा. किकरीपार याने काजलला संपविण्याचा कट रचला. यासाठी त्याने गोपाल केशोराव डोये रा. गोंदिया व गोंदिया येथील दोन अल्पवयीन आरोपींना सोबत घेऊन १४ डिसेंबर रोजी काजलला मांडोदेवी देवस्थान परिसरातील जंगलात नेले व गळा चिरुन हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २४ डिसेंबरपयर्ंत पोलिस कोठडी सुनावली आहे.याप्रकरणाच्या वैद्यकीय तपासात आरोपींनी मृतकावर अतिप्रसंग केल्यानंतर हत्या केल्याचे पुढे आले असल्याने पोलीस त्यादिशेने तपास करीत असून या प्रकरणात आणखी किती जणांचा समावेश आहे. याचा तपास आमगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले, पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.