तीन किलो गांजासह दोघांना अटक

0
11

गोंदिया,दि.28 : रेल्वेगाडीतून गांजाची तस्करी करणार्‍या दोन आरोपींसह ३0 हजार रुपये किमतीचा ३ किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई रेल्वे सुरक्षा दलाच्या गुप्तचर शाखेचे उपनिरीक्षक एस. एस. बघेल, प्रधान आरक्षक आर. सी. कटरे व त्यांच्या चमूने केली.
सविस्तर वृत्त असे की, गोंदिया रेल्वे सुरक्षा दल आमगाव रेल्वे हद्दीत शोधमोहिम राबवित असताना शालीमार एक्सप्रेसच्या जनरल डब्ब्यामध्ये दोन इसम गोंदिया-आमगाव दरम्यान संशयास्पद स्थितीत आढळले. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांची विचारपूस केली असता त्यांनी दिलेल्या थातूरमातूर उत्तरामुळे त्यांच्याजवळील पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये प्लास्टीकच्या बॅगमध्ये ३0 हजार रुपये किमतीचा ३ किलो गांजा आढळला. विशेष म्हणजे आरोपींवर गांजा बाळगण्याचा, विक्रीचा 0कवा वाहतुकीचा परवानाही नव्हता. त्यांच्याजवळ रायपूर ते आमगाव दरम्यानचे प्रवासी तिकीट मिळाले. टिकाराम मुसरे आणि आशिष मेश्राम हे दोघेही मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील लांजी येथील रहिवासी आहेत. त्यांनी आपले नाव राकेश व विनोद (बदललेले) रा. लांजी असे सांगितले. दरम्यान, दोन्ही आरोपींवर गोंदिया रेल्वे पोलीसात  मादक द्रव्य अधिनियम क्रमांक ३१/१९ कलम २० द्वारा गुन्हा नोंद केला असून आरोपींना अटक करण्यात आले आहे. पुढील तपास रेल्वेचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज चक्रे करीत आहेत.