तहसिलदार हिंगेना धमकी देणारे रेती तस्कर गजाआड

0
24

साकोली,दि.०१ : येथील तहसीलदारांना जीवे मारण्याची धमकी देणाèया तीन रेती तस्करांना साकोली पोलिसांनी अटक केली आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवून तीन टिप्परही जप्त करण्यात आले.
तहसीलदार अरविंद हिंगे हे आज शुक्रवारी(दि.०१) सकाळी साकोली तालुक्यातील एकोडी येथे शासकीय कामानिमित्ताने गेले असता टिप्पर क्रमांक एमएच ३६ एफ ३४४९ रेतीची वाहतूक करताना आढळून आले.दरम्यान तहसीलदार qहगेनी सदर टिप्परच्या चालकाला रॉयल्टी दाखविण्यास सांगितले. त्यावरून वाद घालत तहसीलदारांच्या शासकीय वाहनासमोर आडवे झाले. शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.तसेच शाब्दिक हुज्जत घालून तहसीलदार हिंगे यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकारानंतर तहसीलदार अरविंद हिंगे यांनी साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तहसीलदारांच्या तक्रारीवरून राकेश बांते (३३) रा. भिलेवाडा, अतुल रंगारी (२०) रा. नवरगाव, सुनील कुंभारे (२२) रा. कोकणागड यांच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून तिघांना तात्काळ अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रेवतकर, जमादार मस्के, परशुरामकर करीत आहे.