सुरजागड प्रकल्पाचे बंद काम सुरु करा कामगारांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

0
21

गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.०१ः-जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड प्रकल्पाचे काम गेल्या १६ जानेवारीला झालेल्या एका अपघातानंतर बंद करण्यात आल्याने परिसरातील सुमारे हजार कामगारांच्या कुटूबियांवर उपासमारीची पाळी आली सदर प्रकल्पाचे काम त्वरीत सुरु करण्यात याव या मागणीचे निवेदन स्थानिक कामगारांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्यामार्फेत मुख्यमंत्र्याना निवेदन पाठवून आज(दि.०१)केली आहे.
निवेदनात काही संधी साधू राजकीय नेते स्थानिक कामगारांचा आर्थिक विकास होऊ नये या दृष्टीने काम बंद करण्याची मागणी करीत असल्याचा उल्लेख करीत जर सुरजागड खाणीवरील वाहनामुळे अपघात झाल्याने काम बंद करणे सयुंक्तिक नसून जर असेच असेल तर सर्वच कुठलेही वाहतुक न होता दळणवळणाची सर्व सोयच बंद करुन टाका अशी मागणी करीत हे मान्य आहे काय अशा प्रश्नही उपस्थित केला आहे.ग्रामीण भागातील कामगारांचे आर्थिक राहणीमान उंचावे असे वाटत असेल तर सरकारने त्वरीत सुरजागड प्रकल्पाचे काम त्वरीत सुरु करुन आमच्या चुली पेटवा अशी मागणी केली आहे.सदर निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी दामोदर नान्हे यांच्या मार्फेत पाठविण्यात आले.निवेदन देतेवेळी २०० च्यावर कामगार उपस्थित होते.त्यामध्ये प्रसाद नामेवार,मिथुन जोशी,कुंदन आसुटकर,संजय सोमय्या,सचिन गड्डमवार,चंदू गुंडरू,संजय विश्वास,मोहित मंडक,राकेश रावजी,अभय पुलीवार,तिरुपती झाडे आदींचा समावेश होता.