साखरीटोला दि. ११: संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत गांधीटोला ग्रामपंचायतने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे विभागीय स्तरावर प्रथम तसेच साने गुरुजी स्वच्छ प्राथमिक शाळा स्पर्धेत जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा गांधीटोलाला सन २0१२-१३या वर्षासाठी नागपूर विभाग स्तरावर प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व एक लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे झालेल्या या कार्यक्रमात सरपंच रेखा फुंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गायत्री खरवडे, ग्रामसेवक एस.एस. रहांगडाले, स्वच्छता अभियानाचे प्रमुख प्रल्हाद खरवडे, मुख्याध्यापक आर.एल. सांगोडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
गांधीटोला शाळेला हा विभागस्तरावरील पुरस्कार मिळविण्यासाठी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, पं.स. सभापती हिरालाल फाफनवाडे, गटविकास अधिकारी वाय.एस. मोटघरे, यु.टी. राठोड, गटशिक्षणाधिकारी भोयर, उपसरपंच भूमेश्वर मेंढे, संतोष मेंढे, तुकाराम बोहरे, रामेश्वर फुंडे, तंमुस अध्यक्ष किशोर लोथे, ग्रा.पं. सदस्य किशोर भांडारकर, मधू चज्रे, शालू कोरे, आशा मुनेश्वर, वंदना बोहरे, परिचर वाढई, शिक्षक नाखले, ठाकरे, कावळे, मेश्राम, कटरे तसेच सर्व गावकर्यांनी सहकार्य व मार्गदर्शन केले.