बालगंधर्व आर्ट गॅलरीत प्रोग्रेसिव्हच्या विद्याथ्र्यांच्या कलाकृतीची निवड

0
8

गोंदिया, दि. २५-श्रीमती उमादेवी बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारे संचालित प्रोग्रेसिव्ह चित्रकला महाविद्यालय गोंदिया येथील फाउंडेशन व एटीडी या विद्याथ्र्यांच्या कलाकृती ज्येष्ठ शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कलास्पर्धेत व कलाप्रदर्शनात प्रोग्रेसिव्ह चित्रकला महाविद्यालयातील एकूण ९ विद्याथ्र्यांच्या कलाकृतीची निवड झाली आहे.
या विद्याथ्र्यांची कलाकृती १ ते ४ ऑक्टोबर या कालावधीत बालगंधर्व आर्ट गॅलरी पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्याथ्र्यांमध्ये रिमा पॉल, लोकेश नखाते, वैभव मेश्राम, गुरुदास भेलावे, श्रद्धा खापरे, सोनी फुलसुंगे, विजय कटरे, प्रीती पारधी, किरण बानेवार यांचा समावेश आहे. विद्याथ्र्यांचे संस्थाध्यक्ष पंकज कटकवार, निरज कटकवार, अभय गुरव, ओ.टी. रहांगडाले, राकेश पहिरे आqदनी अभिनंदन केले आहे.