विद्यापीठाच्या वर्धापन दिन कार्यक्रम पत्रिकेतून आमदार गजबेचे नाव वगळले

0
8

गडचिरोली दि. २७: २ ऑक्टोबर रोजी गोंडवाना विद्यापीठाचा चौथा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांचे नाव विद्यापीठाच्या प्रशासनाने वगळल्यामुळे राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या प्रशासनाने हा प्रकार हेतुपुरस्सर केला की काय याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
२ ऑक्टोबरला गोंडवाना विद्यापीठाच्या चौथ्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या उद््घाटनासाठी राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर हे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या नावाचा उल्लेखही निमंत्रण पत्रिकेवर करण्यात आला आहे. मात्र जिल्ह्यातील असूनही आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांना निमंत्रितांमधूनही वगळण्यात आले आहे.