मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी परशुरामकर तर सचिव खुशाल कटरे

0
14

गोंदिया दि. ८-गोंदिया जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव येथील प्राचार्य यशवंत परशुरामकर यांची तिसèयांदा अविरोध निवड करण्यात आली आहे.
सभेच्या अध्यक्षस्थानी प्रकाश पटले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून से.नि. प्राचार्य मधुकर रामटेके होते.यावेळी कार्यकरिणीचे गठन सुद्धा करण्यात आले. ही कार्यकारिणी सन २०१५ ते २०१८ पर्यंत राहणार असून सचिव पदावर सडक अजुनी तालुक्यातील खजरी हायस्कुलचे पर्यवेक्षक खुशाल बिरबल कटरे यांची निवड करण्यात आली.उपाध्यक्ष पदावर सालेकसा तालुक्याचे मुख्याध्यापक दिनेश रहांगडाले, शी.एन. नागदेवे गोंदिया, डी.एस. हुकरे देवरी, सहसचिव सुनील पाऊलझगडे अर्जुनी मोरगाव, जी.एम. येडे आमगाव, संघटन सचिव देवेंद्र मच्छिरके सालेकसा, के.एस. वैद्य गोरेगाव, यु.डी. चव्हाण सडक अर्जुनी, कोषाध्यक्ष सी.जी. पाऊलझगडे आमगाव, शैक्षणिक उपक्रम प्रमुख एम.जी. भुरे देवरी, बी.डी. त्रिपाठी गोंदिया, आर.टी. नाकाडे अर्जुनी, संघ प्रवक्ता डी.आर. वैद्य गोरेगाव, डी.एस. मुरकुटे आमगाव, प्रसिद्धी प्रमुख दिलीप चाटोरे सडक अर्जुनी, डी.एच. डहारे सालेकसा, महिला प्रतिनिधी कु. रजिया बेग देवरी, कु.ए.एम. कठाणे सालेकसा, मार्गदर्शक प्रकाश पटेल, एल.बी. धनोले, विदर्भ प्रतिनिधी महेंद्र मेश्राम, रामसागर धावडे, भााऊराव पत्रे आqदची जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारिणीत निवड करण्यात आली.