पोलिस मुख्यालयात पोलिसांनी घेतला आरोग्य शिबीराचा लाभ

0
11

गोंदिया,दि. ८- येथील पोलिस मुख्यालयात पोलिस अधीक्षक शशीकुमार मीना यांच्या मार्गदर्शनात इंम्पेथी फाऊंडेशन चेंबुर, मुंबई यांच्या विद्यमाने पोलिस अधिकारी, कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियाकरिता ड्रिल शेडमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात डोळे तपासणी, मोफत चष्मे वाटप, दातांची तपासणी व चिकित्सा, मधुमेह तपासणी, ईसीजी, बीएमआय व हाडांची तपासणी करण्यात आली.
पोलिस अधीक्षक शशीकुमार मीना, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. संदिप पखाले, पोालिस उपअधीक्षक सुरेश भंवर व इंम्पेथी फाऊंडेशनच्या डॉक्टरांनी दीप प्रज्वलीत केले. या शिबिरात जवळपास १०० पेक्षा अधिक गोंदिया जिल्ह्यातील पोलिस अधिकारी, कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी लाभ घेतला. यावेळी भगतqसग पनवार, डॉ. सुहास सावंत, डॉ. अजित भुरके, डॉ. मंगेश विश्वकर्मा, डॉ. सुरेश हसेजा, डॉ. श्वेता राणा, डॉ. शिल्पा मेश्राम, डॉ. विद्यासागर मोहन, डॉ. विलास आगासे व त्यांच्या चमुंनी सेवा देऊन शिबीर योग्यप्रकारे पार पाडण्यास परिश्रम घेतले. पोलिस अधीक्षक शशीकुमार मीना व अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांच्या हस्ते डॉक्टरांना स्मृतीचिन्ह देण्यात आले. शिबिरात यशवंतराव सोहनी, डी.बी. ईलमकर, मंदार जवळे, सुनील बाम्डेकर व अधिकारी, कर्मचारी, लिपीक वर्ग त्यांचे कुुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन अविनाश गडाख यांनी केले. आभार डॉ. संदीप पखाले यांनी मानले. शिबिराच्या यशस्वितेसाठी सुरेश भवर, सुनील बाम्डेकर, अभिजीत अभंग, चंद्रबहादुर ठाकुर, सुनील मेश्राम व राज वैद्य, नितीन तोमर, रोशन उईके, सेवक राऊत, अंकलेश येसूर यांनी परिश्रम घेतले.