सोनसरीच्या दोन युवकांचा डोहात बुडून मृत्यू

0
11

कुरखेडा, दि..२५: अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या दोन युवकांचा नदीतील डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव येथील नदीसंगमावर घडली. सुधीर फाल्गून समर्थ(२८) व प्रेमानंद तात्याजी समर्थ(२७) अशी मृत युवकांची नावे असून, ते कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील रहिवासी होते.