शिक्षक संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

0
14

आमगाव दि. २७ : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्यावत करण्यासाठी प्रगणक म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिक्षकांना नेमण्यात येवू नये. नेमल्यास शिक्षकांचा बहिष्कार राहील. याबाबत नगरपंचायत आमगाव येथे प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघ व प्राथमिक शिक्षक भारती या संघटनांची संयुक्त सभा झाली. यात नोंदवही अद्यावत करणाच्या कामाला राज्य संघटनेच्या निर्णयानुसार सर्व संघटनांनी बहिष्कार घालून तसे निवेदन तहसीलदार पवार, पं.स. सभापती, उपसभापती, खंडविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी आमगाव यांना देण्यात आले. शासन निर्णयातही जनगणना, नैसर्गिक आपत्ती व निवडणूक कामे वगळता कोणतीही अशैक्षणिक कामे देण्यात येवू नये, असे स्पष्ट निर्देश आहे. त्यामुळे अशैक्षणिक कामे शिक्षकांना सोपविण्यात येवू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी शिक्षक समितीचे सरचिटणिस एल.यू. खोब्रागडे, तालुका अध्यक्ष एन.बी. बिसेन, बी.एस. केसाळे, ए.टी. टेंभुर्णीकर, शिक्षक संघाचे जिल्हा नेते डी.टी. कावळे, प्रकाश कुंभारे आदी उपस्थित होते.