हरणाची शिकार करणाèया ८ आरोपींना वनकोठडी

0
18

गोंदिया दि.२७- नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाèया लोधीटोला परिसरात काही लोकांनी आपल्या शेतात विद्युत करंटच्या माध्यमातून हरणाची शिकार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. लोधीटोला गाव हे नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेलगत येते. त्यामुळे या गावात नेहमीच वन्य प्राण्याचा वावर असतो.त्यातच हरणाचा कळप लोधीटोला गावातील रोशनलाल बघेले यांच्या शेतात नेहमीच यायचा.त्यामुळे त्यांनी गावातील काही लोकांशी संगनमत करून शनिवारी रात्री आपल्या शेतात विजेचे जिवंत तार लावून हरणाची शिकार केली. यात एका हरणाचा जागीच मृत्यू झाला.त्या हरणाला कापून आठही आरोपीने आपसात वाटून घेतले आणि त्याचे मटण तयार करून गावात पार्टी केली.या पार्टीची माहिती गावकèयांना लागताच वन विभागाला माहिती दिली.त्या माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद मेश्राम आणि आपल्या चमू सह घटना स्थळ गाठून आरोपींना पार्टी करताना रंगेहाथ अटक केली. यात मुख्य आरोपी रोशनलाल बघेले, जयपाल पुसाम ,शेतलाल बघेल ,धनराज कावले ,दुर्गाप्रसाद मारस्कोल्हे ,गोरीशंकर गावराने ,झांमसिह रंगीरे ,प्रकाश मारस्कोल्हे यांचा समावेश आहे शिकार करण्याकरिता वापरलेले साहित्यामध्ये कोयता, विद्युत तार, हरणाचे कातळे व मटण आरोपीकडून जप्त करण्यात आले असून आरोपींना दोन दिवसाचा एफसीआर दिला आहे.